⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्गनगरी येथील माजी सैनिकासाठी असलेल्या एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’ची मेडीकल स्टोअरची वेळ आता साडे नऊ वाजता करण्यात आल्याने माजी सैनिकांची होणारी गैरसोय टळली आहे. इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग च्या वतीने अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी आभार व्यक्त केले आहे.
ओरस येथील एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम च्या ठिकाणी
ओपीडीमध्ये चेकअप ०८.०० वाजता झाल्यानंतर केवळ मेडीसीन घेण्यासाठी रुग्णांना जवळजवळ ११.०० वाजेपर्यंत थांबून रहावे लागत होते. जिल्हाभरातून येणारे माजी सैनिक असतात त्यांना एस.टी. ने ये जा करावी लागत असल्याने त्रास सहन करावा – लागतो. यासाठी इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्गच्या वतीने ईसीएचएस, सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे मेडीकल स्टोअर सुरू होण्याची वेळ १०.३० होती ती वेळ सकाळी ९.०० वाजता करण्यात यावी हि विनंती केलेली होती. संघटनेने केलेल्या विनंती नुसार कर्नल व्ही. के. सिंग (रिटा.) अधिकारी OIC ईसीएचएस सिंधुदुर्गनगरी यांनी मेडीकल स्टोअर (औषध वितरण) सुरू होण्याची वेळ १०.३० होती ती बदलून सकाळी ०९.३० वाजता केलेली आहे.
ओरस येथील एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’च्या मेडीकल स्टोअरची वेळ आता साडे नऊ वाजता
