राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करू नये

कुडाळ तालुका भाजप अध्यक्ष दादा साईल यांचा इशारा

⚡कुडाळ ता.०८-: औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि औरंगजेब नेता म्हणून प्रिय असणाऱ्यांना आपल्या नेत्याची औरंगजेबाबरोबर केलेली तुलना मात्र झोंबते. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आणि कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करू नये अन्यथा आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नेहमीच हिंदू आणि अन्य धर्मीयांमध्ये कलगीतुरा लावून मतांचे राजकारण करायला सुपरिचित आहेत. परंतु, आम्ही कधीही हिंदू मुसलमान असा भेदभाव केला नाही उलट सर्वधर्मसमभाव हाच भाजपाच्या राजकारणाचा मूलमंत्र आहे.
त्यामुळे जेव्हा शरद पवार यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल चिंता वाटायला लागते आणि या नेत्यांना हिंदूंच्या मंदिरात जायलाही लाज वाटते. अशांना औरंगजेबाची औलाद म्हटलं तर कुठे बिघडलं? आम्ही देखील या औरंग्याच्या अवलादी आत्ताच कुठून निर्माण झाल्या याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दादा साईल यांनी दिला.
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी औरंगजेब आणि त्याच्या औलांदींचे उदात्तीकरण आम्ही कोणत्या परिस्थितीत खपवून घेणार नाही आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर नेहमीच देत राहू. याची देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोंद घ्यावी.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याजवळ यायचे सोडाच वाकड्या नजरेने देखील पाहण्याची हिम्मत करू नये अन्यथा आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा दादा साईल यांनी दिला.

You cannot copy content of this page