दोन वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना आ राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

मालवण दि प्रतिनिधी:
वीज वितरणच्या देवगड उपविभागीय कार्यालय येथे अतांत्रिक कंत्राटी लिपिक पदी विद्यानंद शिवाजी चव्हाण आणि यश अविनाश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या दोन्ही कर्मचाऱ्यांना गुरुवारी नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी कामगार नेते तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, युवकचे तालुकाध्यक्ष अमित साटम, सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बांदेकर, महेश राऊळ, चेतन सावंत, कृष्णा पवार, दाजी कुंभार, विवेक हुले, सर्वेश साबळे आदी कामगार उपस्थित होते.

नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा विज कंत्राटी कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी करण्यात आली होती. कुडाळ विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी संदीप बांदेकर तर कणकवली विभाग जिल्हाध्यक्ष पदी धोंडू उर्फ रुपेश पवार यांची निवड करण्यात आली होती. या दोघानाही आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page