खोटे प्रमाणपत्र प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना सशर्त जामीन

ओरोस ता ८
भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून पोलीस शिपाई पदाची नोकरी बळकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तिघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी अतिरिक्त आहेत मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. संशयित यांच्यावतीने ऍड संग्राम देसाई, ऍड अशपाक शेख व ऍड अविनाश परब यांनी काम पाहिले.
सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात निवड झालेल्या चक्क दोन उमेदवारांनी बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( रा.जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले ( रा.मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर ) या दोन उमेदवारांसह त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
यासाठी संशयितांच्या शोधासाठी सिंधुदुर्गनगरी पोलिसांची पथके लातूर आणि बीड जिल्ह्यात गेली होती. यातील ज्ञानेश्वर सातपुते. रा. जांब जिल्हा बीड या उमेदवारासह त्यांना सहकार्य करणाऱ्या रामकिशन केदार रा. बीड व नागोराव गायकवाड रा. लातूर अशा तिघांना पोलिसांनी त्यांच्या जिल्ह्यात जावून अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आता न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी १५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.

You cannot copy content of this page