कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते दरम्यान कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम १२ जून ते १६ जून असा हा असणार आहे याबाबत सात जून रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर २२ मे रोजी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता हा राजीनामा ६ जून रोजी मंजूर होऊन ७ जून रोजी जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडी बाबत आदेश निर्गमित केले यामध्ये १२ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून त्या दिवशी अर्जाची छाननी होणार आहे. १४ जून रोजी अपील दाखल करण्याची मुदत असून १५ जून रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. १६ जून रोजी दुपारी १२ वा. नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेमध्ये अध्यक्ष पदाची निवड जाहीर केली जाणार आहे असा हा शासकीय कार्यक्रम आहे.
