मळगावातील दशावतार नाट्यप्रयोगाला मोठा प्रतिसाद

श्रीदेवी भूमिका नाट्यमंडळाचा स्थापनेनंतर प्रथमच झाला प्रयोग

⚡सावंतवाडी ता.०५-: श्रीदेवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ मळगाव प्रस्तुत चित्रांगी गंधर्व उद्धार हा महान पौराणिक नाटक प्रयोग मळगाव येथील आझाद मैदान येथे रविवार ४ जन रोजी संपन्न झाला. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी सिंधुदुर्ग तसेच लगतच्या गोवा राज्यातील नाट्यप्रेमिनी उपस्थिती दर्शविली. कंपनीचे मालक नितीन आसयेकर यांनी कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांच्या मळगाव गावात प्रथमच नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

सिद्धयेश तेंडोलकर मित्रमंडळ व मळगाव ग्रामस्थांनी रसिक प्रेक्षकांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनी आभार मानले. नितीन आसियेकर यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करण्यासाठी कोकण विभागीय महिला अध्यक्ष राष्ट्रवादी अर्चना ताई घारे परब, पुंडलिक दळवी, आशिये पंच किरण सावंत,निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, नीरवडे माजी उपसरपच चंद्रकांत गावडे, श्री.हरी आसयेकर नात्यप्रेमी संतोष गावडे, सोनुली नंदू गावकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page