मंत्री दीपक केसरकर;पार्किंगचा प्रश्न सुटणार
⚡सावंतवाडी ता.०५-: येथील भाजी विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सुसज्ज भाजी मंडई उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान भाजी मंडई इमारत उभारण्यात येणार असल्याने शहरातील होणारी गाड्या पार्किंगची गैरसोय दूर होणार असल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी केसरकर बोलताना म्हणाले,दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै. रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम याशिवाय क्रीडा संकुलनाचे भूमिपूजनही होणार आहेत तसेच दोडामार्ग रुग्णालय सावंतवाडी शासकीय पर्णकुटी विश्रामगृह, याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील तालुका क्रीडा संकुलन व ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचेही भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
मंत्री केसरकर म्हणाले, येथील जिमखाना मैदानाची रुंदी वाढवण्यात येणार आहे त्यामुळे क्रिकेट मैदानाबरोबरच कबड्डी खो-खो बास्केटबॉल व इतर क्रीडा मैदान या ठिकाणी उभारी जाणार आहे परिपूर्ण असे स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे येथे पंधरा दिवसात याचेही लोकार्पण केले जाणार आहे तर सावंतवाडी शहराची लाकडी खेळण्याची परंपरा जपण्यासाठी या ठिकाणी म्युझियम उभारले जाणार आहे तर मटण मार्केटची इमारतही जुनी झाली असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला आहे लवकरच हे कामही सुरू केले जाणार आहे सावंतवाडी बस स्टॅन्ड व शहरातील नाल्यांचे काम हाती घेतले जाणार आहे त्यामुळे सावंतवाडी शहर सुंदर होत असताना सर्वांच्या सहकार्याचे ही आवश्यकता आहे.एकूणच हे सर्व करत असताना
येथील पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य आपल्याला मिळाले त्यामुळे त्यांचे आपण आभारी आहोत.
