पाडलोसमध्ये काजू बागेस आग

लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज

⚡बांदा ता.०३-: पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमाला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र काजू कलमांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.


भोम परिसरात अनेक शेतकऱ्यांनी काजू लागवड व अन्य उत्पन्न घेणारी झाडे, कलमे लावली आहेत. दुपारी बागेतून अचानक धूर येत असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. आग लागल्याचे समजताच गावातील सर्व ग्रामस्थांनी काजू बागेच्या दिशेने धाव घेतली. पाणी तसेच झाडाझुडपांच्या फांद्या मारत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत आसोलकर, प्रशांत वराडकर, भरत शेरलेकर, रमेश करमळकर यांच्या काजू बागांचे नुकसान झाले. तर जीवाची परवा न करता आग विझवण्यासाठी गेलेले गोपाळ करमळकर आदी शेतकऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले.
गावातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतल्याने मोठे नुकसान टळले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याच्या प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.

You cannot copy content of this page