_अनाधिकृत सिलिका मायनिंग व अवैद्य वाळू व्यवसायिकांच्या पाठीशी कोण?; प्रशासकीय अधिकारी व सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे.
*💫कणकवली दि.२५-:* अवैध मायनिंग यापूर्वी सुद्धा आम्ही आवाज उठवला आहे.खरतर कुंपणच शेत खात आहे.अधिकारी,कर्मचारी व पोलीस आणि मायनिंग अधिकारी एकत्र अनाधिकृत काम करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.यापूर्वी जिल्हाधिकारी यांना भेटून माहिती दिली तरी कारवाई झाली नाही. कासार्डे येथे फक्त तीन लोक लीज धारक आहेत.गेली अनेक वर्षांपासून अनधिकृत सिलिका मायनिंग उत्खनन होऊन शासनाची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या अनाधिकृत मायनिंग ची निवृत्त न्यायाधीश याच्यामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी राज्यपाल व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कासार्डे गावातील लोकांनी अनेकदा आवाज उठवला होता.लगत गावातील नागरिकांनी दूषित पाणी सर्वत्र आहे.याबाबत उपोषण केले. तरी कोणती कारवाई करण्यात आली नाही स्थानिक प्रशासन अधिकारी मायनिंग व्यवसायिकांना पाठीशी घालत आहे यांच्यामागे वरदहस्त कोणाचा आहे?सत्ताधारी पक्षाचे जि. प.सदस्य सहभागी आहे.खोटे पासेस दिले जात आहेत,मायनिंग अधिकारी व मायनिग विभाग संचालक याची चौकशी करा.याबाबत तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व खा.नारायण राणे याच्याकडे मागणी केली आहे.उद्याच्या अधिवेशनात आवाज उठवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे,असे राजन तेली यांनी सांगितले. मुबई येथील कंपनी लीज घेते,कायदा धाब्यावर बसवून गैरव्यवहार होत आहे,त्याची चौकशी झाली पाहिजे.बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. आचिणे मायनिग चे वर्षोनुवर्षे काम चालू होते,ते मायनिंग कोणी बंद पाडले.कासार्डे येथे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या अनेक गोष्टी त्या गावात चालू आहे.एवढं सगळं होत असताना प्रशासन गप्प का ? फोंडा व वैभववाडी पोलीस चेक पोस्ट आहे.अधिकारी व कर्मचारी काय करतात? असा सवालही राजन तेली यांनी उपस्थित केला आहे. गेली दोन वर्षे वाळू लिलाव नाही.१६ वाळू पट्टे झाले,त्या ठिकाणी वाळूचा नाही.लॉकडाऊन मध्ये गोवा, कोल्हापूर हद्दीत गाडया गेल्या कशा? पहाटे २ ते ५ वाजेपर्यंत वाहतूक झाली,माझ्या माहितीप्रमाणे आहे.अधिकृत वाळू काढणाऱ्या लोकांना परवडत नाही.खून झाला तो विरोध करायला गेले.त्यामुळेच ती घटना घडली आहे. अनधिकृत २५ होड्या फिरत आहेत,राजकिय वरदहस्त कोणाचा आहे?.लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.महसूल आपला किती बुडतोय यांचीही चौकशी झाली पाहिजे. अधिकृत वाळू धारक आहेत,ते अडचणीत आहे. लिलाव नसताना वाळू येतच कशी? अद्याप टेंडर नाही.प्रशासन काय करत आहे?प्रशासनाची भूमिका काय?शेतकऱ्यांनी मागर बांधण्यासाठी बैल गाडीने वाळू काढल्यास कारवाई तलाठी करतात. रात्रीची संचारबंदी केल्यामुळे चोरटी वाळू व चोरटी दारू व्यवसाय फोफावणार आहे, सगळ्यांचे साटेलोटे आहेत, असा आरोप राजन तेली यांनी केला.