जिल्हा बँकेच्या निवडणुका घेण्यास तीन पक्षांचे सरकार घाबरते-राजन तेली…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ६ व्या वेळी पुढे गेली..

*💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ६ व्या वेळी पुढे गेली आहे.जिल्हातील १००९ मतदार आहेत,तरीही कोरोनाचे कारण पुढे करत सरकार निवडणूक घायला घाबरत आहे.तीन पक्षाचे सरकार असल्याने एकमेकांवर विश्वास नसल्याने घाबरत आहे.हा राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. यासंदर्भात सहकार आयुक्त जगदीश पाटील यांना पत्र लिहणार आहे,निवडणूका बाकीच्या झाल्या आहेत.जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक काही बँकांच्या होणार आहेत.मग सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक पुढे का जाते?सरकार घाबरले आहे,निवडणुकीपासून पळ काढण्याचा हा पर्यंत करत आहे, असा टोला राजन तेली यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page