⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी सकाळी 6.50 वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव.
सोमवार दि. 5 जून 2023 रोजी केसरी ता. सावंतवाडी येथे राखीव. मंगळवार दिनांक 6 जून 2023 सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून कुडाळ कडे प्रयाण. सकाळी 9.30 कुडाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते 1 वाजता ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- कुडाळ हास्कूल कुडाळ. दुपारी 1 वाजता कुडाळ येथून ओरसकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता ओरोस येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत कामांचा आढावा. स्थळ : – जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस दुपारी 3 वाजता जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. रात्री 7.30 वाजता ओरोस येथून मोपा (गोवा) विमानतळकडे प्रयाण.
