जिल्ह्याच्या प्रवेशद्वारातील आहे कार्यालय;घाट क्षेत्र असल्याने पुरेसे मनुष्यबळ आवश्यक
आंबोली,ता.३: अनिल चव्हाण. जिल्ह्यातील प्रवेशद्वार असणाऱ्या आंबोली पोलीस दुरक्षेत्रात पोलीस स्टाफ वाढवण्याची दिवस आवश्यकता आहे.पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन आंबोली दुरक्षेत्रात कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे. आंबोली पोलीस दुरक्षेत्राचा एरिया मोठा आहे.घाट क्षेत्र आहे. दरदिवशी साधारण ४ ते ५ अपघात असतात. त्याशिवाय वाहन तपासणी तसेच स्थानिक पोलीस स्टेशन तक्रार निवारण आणि बंदोबस्त या क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कामकाज असते. पावसाळ्यात हजारो पर्यटक आंबोलीत दाखल असतात त्यामुळे बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
आंबोलीत कावळेसाद,हिरण्यकेशी, तसेच गावात फिरता बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. आंबोलीत अप्रिय घटना घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.येथील स्थानकातील पोलिसांना ओव्हर ड्युटी असते.कामाचा व्याप जास्त आहे.त्यामुळे इतर ठिकाणचे कर्मचारी कमी करून आंबोलीत पोलीस कर्मचारी संख्या वाढवणे आवश्यक आहे.वर्षा पर्यटन आढावा बैठक अद्याप झालेली नाही.तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन आंबोली पोलीस स्थानक ज्यादा कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे अशी मागणी आंबोली भागातून होत आहे. महादेवगड रस्ता आणि चौकुळ रस्ता हा पोलीस स्थानकाच्या नियंत्रण कक्षेबाहेर असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी होणारी संशयित वाहतूक किंवा परस्पर चोरटी वाहतूक अनियंत्रित असल्याने पोलिसांनी त्यारस्त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या रस्त्याला कॅमेरा बसवणे व रात्रीच्या वेळी नियंत्रित करणे आवश्यक आहे.
