*💫सावंतवाडी दि.२५* येथे आयोजित करण्यात आलेली ४५ वर्षांवरील लेदर बॉल हौशी क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत कुडाळ संघाने वेंगुर्ला व सावंतवाडी ब संघावर मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु संध्याकाळी पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामने होऊ शकले नाहीत. यावेळी अंतिम फेरीत स्थान प्राप्त केलेल्या कुडाळ संघाला प्रथम पारितोषिक व चषक देण्यात आला असून, सावंतवाडी अ आणि क तसेच कणकवली – देवगड संघाला द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असो. चे अध्यक्ष अनिल हळदिवे, उपाध्यक्ष काका कुडाळकर, सावंतवाडी तालुका असो. चे अध्यक्ष प्रा. शरद शिरोडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले आहे. यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वाचे आयोजकांनी आभार मानले आहेत. तसेच मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष संजू परब यांचे देखील आभार मानले आहेत.
सावंतवाडीत ४५ वर्षांवरील हौशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
