*💫कणकवली दि.२६-:* पं स च्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदी प्रकाश पारकर यांच्या नावावर खासदार नारायण राणे यांनी शिक्कामोर्तब केले असून पारकर यांनी उपसभापती पदासाठी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे. उपसभापतीपदी प्रकाश पारकर यांच्या नावाचा लिफाफा खासदार नारायण राणे यांनी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष संतोष कानडे, शहर तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानुसार पारकर यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले असून दुपारी 3 वाजता प्रकाश पारकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
कणकवली पं स च्या उपसभापतीपदी प्रकाश पारकर…
