राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी केला भाजपात प्रवेश….

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत;कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का

*💫कणकवली दि.२५-:* राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश कणकवलीत ओमगणेश निवास्थानीं करण्यात आला.या प्रवेशने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला फार मोठा धक्का मानला जात आहे. भजापात शेकडोच्या संख्येने प्रवेश केलेल्या मंध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष,बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश वसंत सावंत,तसेच विध्यर्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुतार यांच्या सह,रजत नाईक,केतन धुरी,साहिल वेंगुर्लेकर, दिवाकर, घोगळे, गोवराज घोगळे, साहिल गावडे,राहुल बोभाटे,अभि गाळवनकर,नागेश सुद्रिक, सपना चौधरी, ऋत्विक सुद्रिक, सचिन कोरगावकर, कोस्तुभ राठोड, आदर्श गायकवाड,रोहन वाजरे, ऋषिकेश पाताडे, फारुभ तलिकोट,अनुप राऊळ,ओंकार पालवे,दर्शन कुडाळकर, जितेश पावसकर,अभय सुद्रिक,प्रसाद गावडे,संदेश पावसकर, सौरव मोरे,रोशन कुडाळकर,समीर गावडे,रजत केळुसकर,निलेश परब,अक्षय कोरगावकर,अश असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भाजपा त प्रवेश केला. भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे,यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश करण्यात आला.प्रवेशवेळी जिल्हा अध्यक्ष राजन तेली,संध्या तेरसे,गोट्या सावंत,कुडाळ अध्यक्ष विनय राणे,सचिव संदीप मेस्त्री,विठ्ठल देसाई,याच्या सह युवा मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,नगरसेवक सुनिल बांदेकर,चंदन कांबळी,राजवीर पाटील,तन्मय वालावकर,बाळ कुडाळकर, रुपेश बिडये, विनोद सावंत,राकेश नेमळेकर, काशीनाथ केरकर,आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या कामाची धडाडी पाहून आणि भाजपा पक्षाचे विचार आत्मसात करून आम्ही भाजपा पक्षात राणेंच्या नेतूत्वाखाली काम करण्यासाठी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन प्रवेश केला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष,बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश वसंत सावंत,यांनी दिली.

You cannot copy content of this page