⚡कणकवली ता.३१-: अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आशिये ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ९ मे २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केले होते.त्यानुसार आशिये गावात बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम केल्याबद्दल निधी पुजारे, सावित्री ठाकर या दोन महिलांचा सन्मान सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.त्या महिलांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि रोख ५०० रुपये देत गौरव करण्यात आला.
यावेळी उपसरपंच संदिप जाधव, ग्रामपंचायत सदस्य – विशाखा गुरव, संजना ठाकुर, अंगणवाडी सेविका – तनया बाने, स्नेहल कासले,आशा स्वयसेविका – गार्गी नेमळेकर,ग्रामसेवक – राकेश गोवळकर,सामूहिक आरोग्य अधिकारी – ऐश्वर्या गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
