बांधकाम कागरांच्या २०१९-२० चे प्रलंबित लाभ प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही होणार

भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नाला यश

⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९-२० चे आर्थिक लाभाचे प्रलंबित ऑफलाइन लाभ प्रस्ताव येत्या १५ दिवसात सादर करून मंजुरीचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही साहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाअध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार माहासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री. संदेश आयरे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे कामगार अधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी बांधकम कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, जिल्हा अध्यक्ष भगवान साटम, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, जिल्हा संघटक ओमकार गुरव, जिल्हा सचिव सत्यविजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष जयश्री मडवळ या उपस्थित होत्या. या बैठकीत सन २०१९-२० चे प्रस्ताव मंजूर करण्या बरोबरच कोविड-१९ आर्थिक मदत,औजारे खरेदी करण्यासाठी रुपये ५,००० प्रलंबित आर्थिक मदत,ट्रेनिंग भत्ता रुपये ४,२०० प्रलंबित अर्ज मंजुरीच्या दृष्टीने मंडळास माहिती आठ दिवसात सादर करण्यात येईल असे ठरले. तसेच ऑनलाइन प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांनमार्फत चुकीच्या त्रुटी काढून अर्ज नाकारण्यात येतात याबाबत कर्मचाऱ्यांना समज देण्यात येईल व असे नाकारलेले अर्ज अपडेट करून मंजूर करण्यात येतील असा निर्णय बैठकीत झाला.यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी त्रुटी अपडेट करण्यासाठी कामगारांना ७ दिवसाची मुदत देण्यात येते त्याऐवजी ९० दिवसाची मुदत देण्यात यावी. मध्यान्ह भोजन बंद करून कामगारांना थेट बँक खाती पैसे जमा करण्यात यावेत यासाठी मंडळ कार्यालय येथे एकत्रित पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी भारतीय मजदूर संघाचे कोषाध्यक्ष श्री सुधीर ठाकूर यांनी मागील तीन वर्षांच्या कालावधीत जे प्रश्न सुटलेले नाहीत ते प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने सहाय्यक कामगार आयुक्त श्री.संदेश आयरे यांनी सफलता पूर्वक प्रयत्न केले आणि उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी मीटिंग आयोजित करून तत्परता दाखविली त्याबद्दल धन्यवाद दिले.अशी माहिती भगवान साटम यांनी दिली.

You cannot copy content of this page