१५ वा वित्त आयोगाने आयोजन
बांदा/प्रतिनिधी
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत आवळेगाव ओरोस खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत गावातील बचत गट, महिला व शेतकरी वर्ग यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत एकदिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गावातील महिलांनी मोठ्या संख्येने घेतला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. पूर्वा सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी वर्ग अशा १०७ लोकांनी यात सहभाग घेतला होता. या अभ्यास सहली मध्ये शेळीपालन, काथ्या व्यवसाय, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत आदी विषय समाविष्ट करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून गावातील व्यवसायास वृद्धीस चालना मिळेल तसेच नवउद्योजक तयार होण्यास मदत होईल असे मत सौ पूर्वा सावंत यांनी यावेळी मांडले.
कोकण संस्थेच्या वतीने व्यवस्थापक प्रथमेश सावंत, समीर शिर्के, प्रदीप पवार यांनी या सहलीचे नियोजन केले होते.
फोटो :-
वेंगुर्ले येथे अभ्यास सहलीत माहिती घेताना महिला.
