दुचाकी पळविण्याचा अज्ञाताचा प्रयत्न फसला…

सावंतवाडी गवळी तिठा येथील प्रकार

सावंतवाडी ता.३१-: केसकर्तनालया समोर लावलेली दुचाकी अज्ञात युवकाकडून पळवून नेण्याचा प्रकार सायंकाळी गवळी तिठा परिसरात घडला. दुचाकीला चावी विसरल्याचा फायदा घेत त्याने हा प्रयत्न केला. मात्र पुढे बुर्डी पुल परिसरात दुचाकीला अपघात झाल्याने त्याचा हा प्रयत्न फसला.

अपघातानंतर संबधीत अज्ञात युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याने दुचाकी तेथेच टाकून जंगलात पलायन केल्याचे तेथील काही बघ्याची सांगितले. दरम्यान दुचाकी चालकाने पोलिसात धाव घेत याबाबतची कल्पना दिली.

You cannot copy content of this page