हायवे प्रशासनाविरोधात खारेपाटण येथे करणार आंदोलन
देवगड (प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण रामेश्वरनगर येथे अपघाताला कारणीभूत ठरेल अशा स्वरूपाच्या बनविलेल्या रस्त्याला हायवे प्रशासनाच्या पटलावर आणण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने २९ मे रोजी” ठिय्या”आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी लेखी निवेदना द्वारे दिला आहे.
मुंबई गोवा महामार्ग खारेपाटण रामेश्वर नगर येथे खारेपाटण पोंभुले जाणाऱ्या पूर्वीच्या मार्गाला महामार्ग जोडला आहे .या ठिकाणी खारेपाटण पोंभुरले जाणाऱ्या वाहनांना महामार्ग दुभाजक ओलांडल्यानंतर सुमारे ५०० मीटर महामार्गावरूनच विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागत आहे , अशा प्रवासादरम्यान अपघात होण्याची दाट या ठिकाणी पुरेशी जागा असताना देखील हायवे प्रशासनाने सर्व्हिस रोड केल्या नसल्या कारणाने
: वर नमूद केलेल्या विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागत आहे.ही बाब शासन,प्रशासन,समाज व हायवे प्रशासनाच्या पटलावर आणणे साठी दि.२९ मे २०२३ रोजी स.९ वाजलेपासुन खारेपाटण रामेश्वर नगर येथे घटनात्मक अधिकारात लोकशाही मार्गावर मुंबई गोवा महामार्गावर “ठिय्या “आंदोलन करण्यात येणार आहे.असा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समिती प्रदेशाध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा काही समाज कंटकांकडून प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
