युवतीवर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

बांदा ता.२४-: कोनशी येथे युवतीवर अतिप्रसंग करून तिला जीवे मारण्याच्या प्रकरणी फरार असलेल्या नराधमास बांदा पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. बाबलो शंकर वरक ( वय 30) असे त्याचे नाव आहे. सोमवारी घटना घडल्या नंतर सदर संशयित फरारी होता. त्याला पकडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीसांनी मोठी मोहीम राबवली होती.

यात स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक सुद्धा कार्यरत होते. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन सुद्धा सापडत नव्हते. मंगळवारी सायंकाळी पर्यंत त्याला यश आले नव्हते. मंगळवारी रात्री तो घरात असल्याचे वृत्त बांदा पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून त्याला राहत्या घरामधून अटक केले. सध्या त्याला सावंतवाडी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

You cannot copy content of this page