दिवाळीनंतर रुग्ण वाढल्याने निर्णय होण्याची शक्यता ?
*💫मुंबई दि.२३-:* दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ”काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल,” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.