राष्ट्रवादी चे नेते प्रवीण भोसले यांचा वाडा केला निर्जंतुकीकरण
*💫सावंतवाडी दि.२३-:* माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांना कोरोनाबाधा झाल्याने ते ऊपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. तिरोडा येथे ते वास्तवास असल्याने त्यांचा वाडा कंटेन्मेंट झोन करण्यात आला. पंचक्रोशीत ईतरत्र कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी प्रवीण भोसले यांनी संजू विर्नोडकर यांना संपर्क केला. नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांनी मा. नारायणराव राणे यांच्याच सेवाभावात राजकारण नाही, हा आदर्श ठेवून त्वरीत प्रवीण भोसले परीवाराचा हा प्रशस्त वाडा, भींती, पाटेश्वर मंदिर, दरबार, सर्व शयनकक्ष, स्वयंपाक गृहे, गेस्ट हाऊस, गोशाळा, वहाने आणि सर्व परीसर रस्ते नाॅब्लिच सोलुशनने निर्जंतुकीकरण केले. प्रवीण भोसले हे सावंतवाडीचे नेते असुन अम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, म्हणुन दोडामार्ग येथिल सॅनिटाईज कामे बाजुला ठेवून त्वरीत येथे कार्य केले, असे संजू विर्नोडकर यांनी सांगितले. पुर्ण वाडा व परिसर निर्जंतुकीकरण ऊपक्रम पाहुन प्रविण भोसले यांचे भाऊ कर्नल सुभाष प्रतापराव भोसले यांनी या टिमचे कौतुक केले. गेले आठ महीने सचोटीने हि जनसवा करत असल्याबद्दल धन्यवाद दिले. या कार्यात संजू विर्नोडकर, आकाश मराठे, संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, सचिन घाडी, सागर मळगावकर यांनी सहभाग घेतला. यावेळी कर्नल सुभाष भोसले, गौरी भोसले, मनोज वाघमोरे आकाश शिरे उपस्थित होते.