माजगाव जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी विल्यम सालढाणा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सच्चिदानंद मधुकर बुगडे यांची तर माजगाव जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी विल्यम जॉन सालढाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दीलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, रायगड महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकुर, कौस्तुभ गावडे, काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, युवक शहराध्यक्ष साद शेख, स्मिता वागळे, मंजुषा डांगी, मोहसीन मुल्ला, इंद्रनील अनगोळकर, जास्मिन लक्ष्मेश्वर, अन्वर खान, अॅड. राजेश वारंग, रूपेश आईर आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग कराल व सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न कराल, अशी आशा यावेळी सांगेलकर यांनी व्यक्त केली.