वीज खांबावरील स्पार्किंगमुळे घडली दुर्घटना अग्नीशमकबंबाअभावी गैरसोय
*💫मालवण दि.२३-:* वीज खांबावर झालेल्या स्पार्किंग मुळे बोर्डिंग मैदानावरील गवताने पेट घेतल्याने काही क्षणात मैदानवर आग भडकली. या आगीत मैदानासभोवताली लावण्यात आलेल्या झाडांचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेचा अग्निशमन बंब नसल्याने आग विझवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.