बांदा येथे राजाराम सावंत यांच्या निवासस्थानी उदयनराजे भोसले यांनी दिली सदीच्छा भेट
*💫बांदा दि..२३-:* मराठा आरक्षणाबाबत ‘आता नाही, योग्य वेळ आल्यावर बोलेन, पण सपाटून बोलेन’ असा सुचक इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बांदा येथे पत्रकारांशी बोलताना दिला. बांदा येथे मराठा समाज अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सदिच्छा भेटीत उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी व भाजपचे नेते उपस्थित होते. भोसले म्हणाले, मराठा आरक्षणाविषयी आता काही न बोलता योग्य वेळ आल्यावरच बोलेन असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या इशाऱ्यामुळे भविष्यात राज्य सरकारला उदयनराजे यांच्या चौफेर टीकेला तोंड द्यावे लागेल.