ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची सभा वैशाली नाईक यांच्या अध्यक्षेखाली संपन्न

सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा

सावंतवाङी, वेंगुर्ला, दोङामार्ग या विभागातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची विभागीय सभा अध्यक्षा वैशाली नाईक यांच्या अध्यक्षेखाली पार पाङली. या सभेत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सुधारीत किमान वेतन लागू करणे, भविष्य निर्वाह निधी रक्कम जमा करणे, सेवा पुस्तके अद्यावत करणे याबाबत आढावा घेण्यात आला. सभेस उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना सेवा-शर्ती दिल्या जात असल्याचे निर्दशनास आले. पण चर्चेदरम्यान ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा -शर्ती दिल्या जात नाही, अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार तालुकाध्यक्षांकङे करण्याच्या सुचना विभागीय अध्यक्षा वैशाली नाईक यांनी केल्या. तसेच विभागातील सर्व गटविकास अधिकारी सेवा -विषयक बाबींबाबत चर्चा करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. यावेळी वेगूर्ला तालुकाध्यक्ष शंकर मातोंङकर, सावंतवाङी तालुकाध्यक्ष हनुमान केदार, दोङामार्ग तालुकाध्यक्ष विनोद परमेकर तसेच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्खेने उपस्थित होते. विभागीय अध्यक्षा नाईक यांनी संघटना पदाचा कार्यभार स्विकारल्यापासुन कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीबाबत स्वत : लक्ष घालुन तक्रारीचा निपटारा करत असल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमधुन समाधान व्यव्त होत आहे. तसेच संघटना सभासद पुर्नरनोंदणी प्रक्रीया सुरु असुन कर्मचाऱ्यांनी आप -आपली नोंदणी करण्याचे आवाहनही नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page