मेढा येथील मुरलीधर मंदिरात चंदन उटी पूजा संपन्न

⚡मालवण ता.२१-: मालवण मेढा येथील मुरलीधर मंदिरात शनिवारी श्रीकृष्णाची चंदन उटी पूजा व मोगरा महोत्सव संपन्न झाला. उन्हाळा ऋतूत भगवंतांना विश्रांती मिळावी या भावनेने ही चंदन उटी पूजा करण्यात आली. यावेळी श्रीकृष्णच्या मूर्ती सभोवताली मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

ह. भ. प. दर्शन वझे व उदय वझे गुरुजी यांच्याकडून ही पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यानिमित्त मंदिरात भजनसम्राट भालचंद्र केळूसकर यांची भजन सेवा व इतर कलाकारांची गायन सेवा पार पडली.

You cannot copy content of this page