तीन दर्जेदार नाटकांचा समावेश
⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या 147व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि प्रसिद्ध नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नाट¬ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा नाट¬ महोत्सव दि.25, 26 आणि 28 मे या कालावधीत कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. नाटकाची वेळ सायंकाळी 6 असून प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे. दि.25 रोजी गो.पु.देशपांडे लिखित “उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक होणार आहे. या नाटकातून एका करारी, तत्त्वनिष्ठ, डाव्या विचारसरणीच्या नेत्याच्या पराभूत थोरवीची गाथा रंगवलेली आहे. लढणारी माणसं का पराभूत होतात हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखकाने यात केला आहे.
दि.26 रोजी महाराष्ट्र राज्य नाट¬ स्पर्धा व कामगार कल्याण नाट¬ महोत्सवामध्ये गडहिंग्लजच्या स्त्री रंगकर्मींचे लक्षवेधी ठरलेले गडहिंग्लज नगरपरिषद व गडहिंग्लज कला अकादमी निर्मित “येस आय ब्ली’ हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार ह्रा स्त्री कलाकार आहेत. बारा वर्षांची बालकलाकार या नाटकाची मुख्य भूमिका साकारत आहे.
तर महोत्सवाच्या समारोपा दिवशी म्हणजेच दि. 28 रोजी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामासाठी बहुमूल्य योगदान देणारे भगतसिंग यांच्या जीवनावरील पियुष मिश्रा लिखित “गगन दमामा बजाओ’ हे नाटक सादर होणार आहे. तरी या नाट¬ महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
