कणकवली शहर भाजपा कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्याचे केंद्र बनेल

आम. नितेश राणे यांच्या हस्ते शहर भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहरातील शहर भाजपाच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी भर दिला जाईल. हे कार्यालय कणकवली शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचे केंद्र बनेल असा विश्वास आमदार श्री. राणे यांनी व्यक्त केला.

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली कंजूमर सोसायटी समोर नगरपंचायत रोडलगत सदरचे कार्यालय सुरू करण्यात आले असून कणकवली नगरपंचायतवर प्रशासक आल्यानंतर लोकनियुक्त नगरसेवक निवडीपर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग केला जाणार असल्याचे यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, मेघा गांगण, शिशिर परुळेकर, विराज भोसले, कविता राणे, रवींद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, बंडू गांगण, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश सावंत, बाळा सावंत, अभय राणे, कल्याण पारकर, राज नलावडे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, हितेन कामतेकर, नवराज झेमणे, बाळा पाटील, अभय राणे, संदीप राणे, चारुदत्त साटम, शिवसूंदर देसाई, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, गणेश तळगावकर, प्राची कर्पे, राजश्री धुमाळे, सुशील पारकर, गीतांजली कामत, संजना सदडेकर, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, कणकवली नगरपंचायत क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि शहराचे सर्वच लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्र मिळून शहरामध्ये आदर्श जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका लागेपर्यंत सत्ता असो किंवा नसो लोकांची सेवा आम्ही करत राहू. या दृष्टिकोनातून टाकलेलं हे अतिशय महत्त्वाचं आणि समाधानकारक पाऊल आहे. त्यामुळे सतत आम्ही जनतेच्या संपर्कात राहू, जनतेच्या कुठच्याही अडीअडचणी असतील ते त्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन लोकांची सेवा करत आहेत. कणकवली जनतेचे प्रश्न आणि विकासात्मक समस्या दूर करण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल असे आम. नितेश राणे म्हणाले.

You cannot copy content of this page