अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून एक निर्दोष

मालवण दि प्रतिनिधी

मालवण कसाल रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संगप्पा धर्मु राठोड याची मालवण न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपी तर्फे ऍड. स्वरूप पई यांनी काम पाहिले.

संगप्पा धर्मु राठोड याने आपल्या ताब्यातील डंपर भरधाव वेगाने चालवून मालवण कसाल हमरस्त्यावर उभ्या असलेल्या एका तरुणीला धडक दिली होती. या अपघातात त्या तरुणीचा मृत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद वराड येथील सतीश वंजारी यांनी मालवण पोलिसात दिल्यानंतर संगप्पा राठोड याच्या विरोधात तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवण न्यायालयात याबाबत दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. संशयित आरोपी तर्फे ऍड. स्वरूप नारायण पई यांनी बाजू मांडली. यात फिर्याद दाखल करण्यास झालेला विलंब, फिर्यादिचे व साक्षीदाराचे जबाबातील विसंगती व तपास कामातील त्रुटी विचारात घेऊन मालवण येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी संगप्पा धर्मु राठोड याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

You cannot copy content of this page