सडूरे आरोग्य केंद्र इमारतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील

तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांचे आश्वास

वैभववाडी संजय शेळके
सडूरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारत बांधकामासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील तसेच बाह्य रुग्ण विभागा विभागाच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्यक सेवा तात्काळ उपयोग करून दिली जाईल असे. आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी दिली नंतर सडूरे, शिराळे, अरुळे,निम अरुळे,सागुळवाडी,व नावळे ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. माजी सरपंच विजय रावराणे यांच्या नेतृत्वाखाली खोरीतील जवळ पाच सरपंच उपोषणाला बसले होते.


सडुरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे पण सदर काम उपकेंद्रातून चालवले जात आहे. त्यामुळे आरोग्य सेवा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर विजयराव राणे तसेच पुढील सर्व आरोळे उपोषणाचे हत्यार उपस्थित होते तालुका केंद्र कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते सायंकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इमारत बांधकामाबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे तसेच गावातील जनते करता बाह्य ऋण विभाग त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहतील जनतेची कोणती गरज होणार नाही अशी आश्वासन त्यांनी दिले आहे आश्वासन पूर्ती न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा माजी सरपंच विजयराव राणे यांनी दिला आहे. दुपारी उपोषण स्थळी गटविकास अधिकारी तथा प्रशासक जयप्रकाश परब यांनी भेट घेतली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डि के सुतार, सडुरे सरपंच दीपक चव्हाण, अरुळे सरपंच मानसी रावराणे, कुर्ली सरपंच विजय पवार, नीम अरुळे सरपंच सज्जन माईनकर, माजी सभापती तथा कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुबे, सागुळवाडी माजी सरपंच प्रकाश पाटील, सूर्यकांत बोडके, एन डी बोडेकर, बापू भोसले, नंदकुमार रावराणे, एस टी माने, आप्पा मिस्त्री, आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page