शिवसेनेच्या माध्यमातून तिरोडा, नाणोस येथील मंजूर हायमास्ट लाईटचे उदघाटन….

तिरोडा येथील उदघाटन रुपेश राऊळ यांच्या तर नाणोस येथील उदघाटन अशोक दळवी यांच्या हस्ते

*💫वेंगुर्ले दि.२४-:* गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून नाणोस आणि तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर असलेल्या हायमास्ट लाईटचे तिरोडा गावातील उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि नाणोस गावातील उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खरेदी विक्री संघाचे बाबल ठाकुर, शिवसेना विभागप्रमुख आबा केरकर, उपविभाग प्रमुख संदेश केरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर, अनिल केरकर, नाणोस सरपंच जीजी जोशी, तिरोडा सरपंच पटेकर, तिरोडा शाखाप्रमुख संजय तिरोडकर, नाणोस शाखाप्रमुख आनंद जोशी, तिरोडा ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गोडकर, बाबू आडारकर, पालकर, नितीन नाणोसकर, सुर्याजी नाणोसकर, नाना कांबळी, रोहन जोशी, नकुळ नाणोसकर, नंदकिशोर नाणोसकर, आबा मयेकर, सुदाम पालयेकर, मधुकर तळकर, रामा तळकर, सुयोग नाणोसकर, पंकज शेट्ये, सोहम नाणोसकर, भास्कर गोडकर आदी नाणोस, तिरोडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page