सिंधुदुर्गात २५ ते ३0 मे रोजी रेल्वेने उपलब्ध होणार खत

झाराप येथे स्वतंत्र गोदाम आणि रॅकला मान्यता : जिल्हा बँकेच्या सहकार्याने खतांची वाहतूक करण्याचे नियोजन

⚡ओरोस १६, -: सिंधुदुर्गतील शेतकऱ्याना वेळेत खत उपलब्ध व्हावे यासाठी फर्टीलायझर च्या माध्यमातून सुपला अठराशे मेट्रिक टन युरिया ५०० असे सव्वा दोन बॅटरी टन खत येत्या २५ ते ३0 मे रोजी झाराप येथे रेल्वेने उपलब्ध होणार आहे झाराप येथे स्वतंत्र गोदाम आणि रॅक ला मान्यता मिळाली आहे,यासाठी जिल्हा बँकेच्या सहकार्याने विकास संस्था पर्यंत थेट खतांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळेत योग्य दराचे रासायनिक खत उपलब्ध व्हावे या दृष्टीने जिल्हा बँक प्रयत्नशील असून खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्याना कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ,यावेळी संचालक महेश सारंग व इतर उपस्थित होते यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन मनीष दळवी म्हणाले गेले काही वर्षे शेतकऱ्यांना खताची रॅग रत्नागिरी येथे असल्यामुळे जून उजाडला तरी वेळेत खत उपलब्ध होत नसेल दरम्यानच्या काळात सेंद्रिय खताच्या नावाखाली काही परत जिल्ह्यातील कंपन्या शेतकऱ्यांच्या माती सेंद्रिय खताच्या नावाखाली खत विक्री करण्याचा धंदाच सुरू केला आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही, यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेत रासायनिक खत उपलब्ध व्हावे म्हणून झाराप येथे रॅक पॉईंट साठी फर्टीलायझर कंपनी रेल्वे बोर्ड त्यांच्या मान्यता मिळाल्या असून जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ९00 कोटी रुपये खर्च करून एक सुसज्ज गोदाम उभा करण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातूनही स्वतंत्र गोदाम उभारण्यात येत आहे लवकरच ही गोदामे उभी झाल्यास खत आणि रास्त धान्य दुकानाचे धान्य उतरविण्यासाठी झाराप हे रॅक पॉईंट होणार आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या २५ते ३० मेदरम्यान अठराशे मॅट्रिक टन सुपला आणि ५०० बॅटरी टन युरिया असे सव्वा दोनशे मीटर खत रेल्वेने उपलब्ध होणार आहे
सध्या गोदामाची कमतरता लक्षात घेता सर्व खरेदी विक्री संघाच्या गोदामामध्ये हे खत उतरवून घेण्यासाठी जिल्हा बँकेने स्वतंत्र वाहतूक व्यवस्था कर्जाचा निर्णय घेतला असून सर्व खरेदी विक्री संघाच्या गोदामामध्ये हे कळ थेट पोचविण्यात येणार आहे योग्य दर्जाचे योग्य दरात शेतकऱ्यांना खत उपलब्ध वेळीच व्हावे या दृष्टीने जिल्हा बँकेने हे थेट खत खरेदी करण्यासाठी पाचशे कोटीचे कमी व्याज दराचे कॅश क्रेडिट विकास संस्थांना उपलब्ध करून दिले आहे येत्या सहा महिन्यात या पाच कोटी चा धनादेश जिल्हा बँकेकडे परत करावयाचा आहे तसेच शेतकऱ्यांना भात बियाणे खते उपलब्ध करण्यासाठी खरेदी करण्यासाठी कर्ज वितरण प्रक्रिया मे पासूनच सुरू करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खतांची खरेदी करण्यासाठी विकास संस्था मार्फत कर्जही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दळवी यांनी सांगितले सोबत फोटो
जिल्ह्यात 25 ते 30 दरम्यान रेल्वे मार्फत खत उपलब्ध होणार मनीष दळवी

You cannot copy content of this page