⚡बांदा ता.१६-: येथील ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या “माझा जीवनप्रवास” या आत्मचरित्रच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बांदा पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने गुरुवार दिनांक १८ रोजी दुपारी ३.३० वाजता येथील नट वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बांदा सरपंच प्रियांका नाईक भूषविणार आहेत. यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, पत्रकार सीमा मराठे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, माजी सभापती प्रमोद कामत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन मंगल कामत यांनी केले आहे.
