कामशेत येथे सिगेट कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कुलचे उद्घाटन…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार; ५० महीलांना मिळणार रोजगार प्रशिक्षण

⚡बांदा ता.१६:- कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहेत. त्याचा पुढील भाग महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणे हे असून त्यासाठी या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पनाचे साधन निर्माण करून देण्याचा मानस संस्थेचा आहे. त्यासंदर्भात सिगेट या खासगी कंपनीला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.


आज कामशेत येथे कोकण संस्थेच्या वतीने सिगेट या कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कुलचे उद्घाटन करण्यात आले. या स्कुलच्या माध्यमातून ५० महिलांना रोजगार प्रशिक्षण, प्रत्येकी शिलाई मशीन, ३ प्रकारचे रोजगार निर्मिती प्रशिक्षण, साधन आणि पुढील १ वर्ष व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रकल्पच्या माध्यमातून कमीतकमी २० गावात शिलाई स्कुल सुरू करण्यात येणार असून या महिलांच्या कुटुंबासह शेकडो कुटुंबाना हातभार तर लागणारच आहे तसेच यांना स्वतःच्या गावात व्यवसाय निर्मितीचे साधन देखील उपलब्ध होणार आहे.
आज या स्कुलची सुरुवात सर्व महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, कोकण संस्थेचे प्रकल्प समन्वयक बापू माने यांनी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला सिगेट कंपनीचे व्यवस्थापक किर्ती वालदिया, कांचन चौधरी, पौर्णिमा राठोड, संपदा पेटकर उपस्थित होत्या तर कोकण संस्थेकडून साक्षी पोटे, सालिना बुटेलो आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या व्यवस्थापक तारा सांगळे यांनी तर आभार संस्थेच्या व्यवस्थापक प्रीती पांगे यांनी मानले.

You cannot copy content of this page