पोलीस बंदोबस्तात सावंतवाडीचा आठवडा बाजार उद्या नव्या जागेत…

परविन शेख; 145 व्यापाऱ्यांसाठी जागेची तरतूद, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य…

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील शहराचा आठवडा बाजार अखेर उद्यापासून गोडाऊन परिसरातील नव्या जागेत पोलीस बंदोबस्तात भरवला जाणार आहे.
कुठल्याही प्रकारे स्थानिक आणि बाहेरचा असा वाद होऊ नये यासाठी प्रयत्न राहणार असून बापूसाहेब महाराज पुतळा ते शिवराम राजे पुतळा परिसरात जे व्यापारी आठवडा बाजारासाठी बसत त्यांनाच नव्या जागेमध्ये प्रथम प्राधान्य देणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने कर्मचारी परवीन शेख यांनी दिली.

तर नव्या जागेमध्ये 145 व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवाय लाइट्स व इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी कोणीही वादविवाद घडून आणण्याचा प्रयत्न करू नये आवाहनही शेख यांनी केले आहे.


सावंतवाडी मोती तलावावरील आठवडा बाजार मागच्या मंगळवारपासून शासकीय गोडाऊन परिसरातील नव्या जागेत लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या मागच्या मंगळवारी हॉकर्स संघटनेच्या वतीने अशोक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नव्या जागेत बसण्यासाठी मनाई करत पालिका प्रशासनाकडे त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती दरम्यान पालिका प्रशासनाने ही मागणी मान्य करत अशा प्रकारच्या सुविधा नव्या जागेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे उद्यापासून हा बाजार नव्या जागेत स्थलांतरित होणार आहे सकाळी पोलीस बंदोबस्तात बाजार सुरू करण्यात येणार आहे यामध्ये शहरातील बापूसाहेब पुतळा ते शिवराम राजे पुतळा परिसरात जे व्यापारी आपला व्यवसाय करत होते त्यांनाच नव्या जागेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे सद्यस्थितीत या ठिकाणी 145 व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे गोडाऊन परिसर ते मिळालीच हायस्कूल पर्यंत हा बाजार बसवण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरचा असा वाद निर्माण करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
संदर्भात प्रशासनाच्या वतीने प्रवीण शेख यांना विचारले असता त्या म्हणाल्या व्यापाऱ्यांसाठी नव्या जागेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पाण्याची तसेच बाथरूमची सुविधा गार्डन तसेच सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहे शिवाय मोठ्या लाईट्स परिसरामध्ये बसवण्यात आल्या आहेत व्यापाऱ्यांसाठी आवश्यक त्या जागेचे मार्किंग करण्यात आली आहे त्यामुळे जागेवरून कोणाचाही वाद उद्भवणार नाही जे प्रथम त्यांना तशी जागा उपलब्ध करून देण्यात येईल वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page