स्थायी समितीची बैठक : केवळ २२ प्रस्तावाना शिफारस
*💫सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के दिव्यांग निधी खर्चावरुन मंगळवारी स्थायी समितीत प्रशासन व सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक होत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना धारेवर धरले. दिव्यांग जिल्हास्तरिय समितीकडे १२३ प्रस्ताव पाठविलेले असताना आर्थिक तरतूद पाहुन केवळ २२ प्रस्तावाना शिफारस दिल्याने हा वाद झाला. मात्र, प्रशासन याबाबत सहमत असल्याने संतोष साटविलकर यानी याला तीव्र आक्षेप घेतला. हा जिल्हा परिषदेच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका घेत या प्रस्तावांना मान्यता देण्याच्या कार्यवाहिला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार सभागृहाने निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या बँ नाथ पै सभागृहात समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती रविंद्र जठार, सावी लोके, शारदा कांबळे, गटनेते रणजीत देसाई, संजय पडते, सुनील म्हापणकर, विष्णुदास कुबल, रेश्मा सावंत, संतोष साटविलकर आदिंसह खातेप्रमुख उपस्थित होते.
