शिक्षक मतदारांनीच परिवर्तनाचा केलाय निर्धार

प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक;
परिवर्तन पॅनलने भूमिका मांडत व्यक्त केला विश्वास

ओरोस ता.१२-: यापूर्वी प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत आमचे तालुका उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. जिल्हा मतदार संघ निवडणुकीत सुद्धा १०० च्या आता मतांनी पराभूत होत होते. मात्र, यावेळी आम्ही बहुसंख्य संघटना एकत्र येत परिवर्तनाचा निर्धार केला आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली असून सर्वच मतदारांनी सत्ता परिवर्तन करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनलच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

परिणामी ते मतदारांत संभ्रम करणारी चुकीची स्टेटमेंट देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप परिवर्तन सहकार पॅनलच्या वतीने आज करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीसाठी परिवर्तन सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलने केलेल्या आरोपांचे यावेळी खंडन करण्यात आले. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म ल देसाई, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, परिवर्तन पॅनेल प्रवक्ते के टी चव्हाण, पुरुषोत्तम शेणई, गणेश नाईक, संजय जाधव, सचिन जाधव, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page