⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण यांच्या वतीने सन्मानार्थ आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेल्या महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा सत्कार डॉ. शैलेंद्र परब यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने मुंबईतील संजय परब, सुशील परब, स्नेहल सुशील परब व तृप्ती स्वप्नील परब यांच्या वतीने शाळेमध्ये करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष शिवराम परब, उपाध्यक्ष संगीता वेदरे, पालक शिक्षक संघाच्या वतीने उपाध्यक्ष स्वप्निल कोळंबेकर, माता पालक संघाच्यावतीने उपाध्यक्ष पायल परब, विद्यार्थ्यांच्यावतीने शालेय स्वराज्य सभा मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री रेवती सुनील लाड तसेच जिल्हास्तरावरती विज्ञान प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या निरजा संजय परब, मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय दहावी व तालुकास्तरीय दुसरी आलेल्या परि प्रकाश यादव तसेच चांगले गुण मिळवलेल्या पार्थ सुनील वेदरे तर शाळेचे मुख्याध्यापक स्मिता लवेंद्र किंजवडेकर, पदवीधर शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, उपशिक्षक रागिणी ठाकूर, सचिन घोटाळे, शाळेचे पोषक आहार कर्मचारी रोहिणी पवार, सुवर्णा दळवी या सर्वांचा कैलासवासी डॉ. शैलेंद्र परब यांच्या स्मरणार्थ पितळीचे नंदा दिप व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार गावचे सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटी अध्यक्ष सुधाकर मुद्राळे, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य उमेश श्रावणकर यांच्या हस्ते करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये कै.शैलेंद्र परब यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने शाळेसाठी 25 हजार रुपयाची देणगी देण्याचे घोषित करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने संजय परब, सुशील परब, स्नेहल परब व तृप्ती परब यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रावण गावातील नितीन पवार, सुरेंद्र तानाजी परब, किशोर अंकुश गावडे, स्वप्निल चंद्रकांत परब, संगीता वेदरे, सुजाता वेदरे, आरती हावळ, सुरिंदर यादव, रेणुका परब, पुनम गवस, शाळेतील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
यावेळी आरती हावळ यांनी मनोगत व्यक्त केले. तर मुंबईत पोलीस खात्यामध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले सुशील परब यांनी विद्यार्थी आणि पालकांना स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन शाळेसाठी सुसज्ज वाचनालय निर्माण करण्यासाठी मदत केली जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय परब यांनी तर आभार विनायक हरकुळकर यांनी मानले.
