तळेरेतील दत्त मंदिरचा 13 मेपासून जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा 

⚡कणकवली ता.१२-: तळेरे औन्दुबरनगर येथील श्री दत्त मंदिरचा जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला 13 मे पासून सुरुवात होणार असून 15 मे रोजी प. पू. श्री. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. 

शनिवार.13 मे रोजी दु. 3 वा. श्री. दत्तमूर्तीची श्री गांगेश्वर मंदिर ते श्री दत्त मंदिर अशी भव्य ढोल ताशांच्या गजरात पारन्पारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी सुंदर चित्ररथ व शिडवणे (कोणेवाडी) येथील श्री. गांगेश्वर ढोल पथक यांचे ढोल वादन व शिडवणे येथील माऊली प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ यांचे विशेष आकर्षण असणार आहे. 

रविवार 14 मे रोजी सकाळी 7 वा. तळेरे घाडीवाडी येथील श्री गांगेश्वर ढोल पथक यांचे ढोल वादन, त्यानंतर प्रायश्चित्त देवांना प्रधान, गार्हाणे, संकल्प, पुण्याहवाचन, मातृता पूजन, जलाधिवास, निद्राधिवास, धान्याधिवास, प्राकार शुध्दि, मंडल देवता आवाहन, अग्नी स्थापना, पर्यायवहन आदी धार्मिक विधी होतील. दू. 1 वा. महाप्रसाद ( भंडारा), त्यानंतर ढोल वादन, दू. 3.30 ते 4.30 वा. श्री. दत्त जन्म आख्यान वाचन, सायंकाळी 4.30 ते 5.30 वा. श्री खापरेश्वर फुगडी मंडळ (मापारवाडी) यांच्या पारंपारिक फुगडी नृत्य होईल. त्यानंतर श्री गांगेश्वर भजन मंडळ तळेरे (गावठण) बुवा संतोष तळेकर, शेवरादेवी भजन मंडळ तळेरे (वाघाचीवाडी) बुवा राजू वळंजू, श्री पावणादेवी भजन मंडळ तोंडवली बुवा संतोष मिराशी, रात्री 8.30 ते 9.30 वा. वारगाव गोकुळवाडी येथील बुवा दिपक नामये यांचे पारंपरिक वारकरी भजन त्यानंतर स्थानिक भजने व त्य्क़नंतर शिरवली महादेवाचीवाडी येथील बुवा सागर मोहिते यांचे वारकरी भजन सादर होईल.

सोमवार 15 मे रोजी सकाळी 7 ते 8 वा. ढोलवादन, सकाळी 8 वा. धार्मिक विधी, प्राकार शुध्दि, मंडल देवता पूजन त्यानंतर सकाळी 9.52 वा. ओणी येथील श्री. प. पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य प. पू. श्री. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर तत्वहोम, महापूजा, बलिदान, पुर्नाहूती, आरती, मंत्र पुष्प इ. दू. 1.30 वा. महाप्रसाद (भंडारा), दू. 3 ते 4 वा. महिलांसाठी हळदीकुंकु समारंभ, 4 ते 5 वा. कवीलकाटे येथील श्री देवी चांमुडेश्वरी फुगडी मंडळ यांचे पारंपरिक फुगडी नृत्य होईल. त्यानंतर गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तिवरे बुवा साहिल परब यांचे संगीत भजन, आनंदयुवा भजन संघ मुंबई बुवा नंदा दीप वंजारे यांचे भजन सादर होणार आहे. रात्री 9 वा. मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ होणार आहे. 

रात्रौ 10.30 वा. चंद्रभागा प्रॉडक्शन निर्मित आलाय मोठा शहाणा हे धमाल विनोदी नाटक होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहन्याचे आवाहन श्री दत्त प्रासादिक सेवा मंडळ आणि महिला मंडळ तळेरे (औन्दुबरनगर) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page