थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

आम. नितेश राणे यांचा टोला;“संजय राऊत आणि अनिल देसाईंमुळे उध्दव ठाकरे संपले.

⚡कणकवली ता.१२-: उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आव्हान आम. नितेश राणे यांनी दिले.संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा जेल मध्ये जातील असे आम. नितेश राणे म्हणाले.

कणकवली येथे आम. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “संजय राऊत आणि अनिल देसाईंमुळे उध्दव ठाकरे संपले. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झालं हे सांगाव? संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे. सरकार अजून भक्कम झाल. नैतिकतेच्या कारणामुळे मी राजीनामा दिला. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे ,संजय राऊत नैतिकतेची भाषा करतायत, मला त्यांना विचारायचं आहे, शिवसेना अधिकृत ही शिंदे साहेबांकडे आहे. उबाठा हे नाव त्यांना तात्पुरत दिलं होतं.त्यांना वेगळं नाव आणि चिन्ह निवडावंच लागेल. राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाईव्ह केलं त्याची उद्धव ठाकरेंना आठवण करून देईन, मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा देतो अस म्हणाला होतात.मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिलेला नाही?तुमच्यात खरच नैतिकता असेल तर देऊन टाका आमदारकीचा राजीनामा. २०१४ ते १९ चा काळ आठवा. उद्धव ठाकरे सख्ख्या भावाची तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे ते कोर्टात जाऊन बघा. महाराष्ट्राला सर्वात बेईमान माणूस कोण असेल तर तो उद्धव ठाकरे.आणि नैतिकतेची भाषा तुम्ही करता.” नितीशकुमार यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावर राणे म्हणाले, “काल नितीशकुमार यांच्या बरोबर लालूंचा मुलगा आलेला होता. ज्या लालूंनी संधी मिळेल तिथे बाळासाहेबांचा अपमान केला होता.हिंदुत्वाचा अपमान केला.तुमच्यात हिंमत असती तर नितीशकुमार आणि लालूंच्या मुलाला बाळासाहेबांच्या खोलीत घेऊन जायला हवं होतं,नतमस्तक व्हायला लावायला हवं होतं. संजय राजाराम राऊत.ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झालास त्याचा पहिला राजीनामा दे. बघू तुझी नैतिकता. .रोज महाविकास आघाडीचे लोक टीका करत आहेत. तू पत्रकार आहेस का हे पाहिलं तपासलं पाहिजे.कुठल्या पत्रकाराकडे एवढी प्रॉपर्टी असते?असा सवाल करताना बाळासाहेबांनी खासदारकी दिली नाही म्हणून ६ जून १९९८ ला लोकप्रभात बाळासाहेबांवर लेख लिहिला होता.असे आम.नितेश राणे म्हणाले.

You cannot copy content of this page