मनसे विद्यार्थी सेनेतर्फे तहसीलदार वर्षा झालटे यांचे स्वागत

⚡मालवण ता.११-: मालवणच्या नूतन तहसीलदार वर्षा झालटे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेमधील तरुण व महिला आघाडी मधील महिलांचा सहभाग बघून तहसीलदार झालटे यांनी कौतुक केले. यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड, युवा उद्योजक प्रितम गावडे, मनसे माजी शहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर ,मनसे माजी तालुकध्यक्ष रामनाथ पराडकर,नरेश चव्हाण,भारती वाघ,प्राजक्ता पार्टे-आढाव, मृणाली शिंदे,कुणाल चोडणेकर,लौकिक मेथर, गणेश सातार्डेकर, राहुल मोंडकर, तथागत मालवणकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page