राठीवडे गांगेश्र्वर देवालयाचा कलशारोहण उत्साही वातावरणात

मालवण दि प्रतिनिधी
हर हर महादेव… श्री देव गांगेश्वराचा जयजयकार असो… असा जयघोष करत… सकाळच्या प्रहरी रवीराजाच्या तेजोमय सूर्यकिरणांच्या साक्षीने… ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, मंगलमय व चैतन्यदायी वातावरणात आज राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाचा कलशारोहण सोहळा संपन्न झाला.

राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाचा संप्रोक्षण विधी व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा गेले तीन दिवस विविध कार्यक्रमानी साजरा झाला. भव्य कलश प्रदक्षिणा मिरवणुकीने प्रारंभ झाल्यावर काल मंदिरात विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडले. तर सोहळ्याचा परमोच्च बिंदू असलेला कलश प्रतिष्ठापनेचा मुख्य विधी सकाळी उत्साहापूर्ण वातावरणात पार पडला. आज सकाळी मंदिरात मंगलाचरण, प्रकारशुद्धी, आवाहित मंडल देवता पूजन झाल्यावर कलशाचे सद्गुरू हेमंत मणेरीकर यांच्या हस्ते पूजन झाले. तर यजमानी मिलिंद गावकर व मानसी गावकर यांच्या हस्तेही पूजन झाले. यानंतर कलशाची मंदिरा भोवती वाजत गाजत प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजून २ मिनिटच्या मुहूर्तावर ढोल ताशांच्या गजरात आणि फटक्यांच्या आतषबाजीत क्रेनच्या साहाय्याने या कलशाचे मंदिराच्या शिखरावर आरोहण करण्यात आले. यानंतर तत्वहोम, प्रायश्चित्त होम, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक आदी विधी होऊन सांगता झाली. यावेळी श्री देव गांगेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी आरती होऊन भाविकांना तीर्थप्रसाद, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी सद्गुरू हेमंत मणेरीकर यांचा मानकरी धुरी यांच्याहस्तें यथोचित सत्कार करण्यात आला तसेच यावेळी राठीवडे पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

सायंकाळच्या सत्रात श्री गांगेश्वर कृपा या विशेषांकाचे प्रकाशन जयराम धुरी यांच्या हस्ते व बाळप्रकाश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुंबई मंडळातील पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी श्री गांगेश्वर सेवा मंडळ (राठीवडे) मुंबई चे अध्यक्ष मुरारी धुरी, मानकरी जयराम धुरी, बाळ प्रकाश ठाकूर, शामसुंदर धुरी, गोपीनाथ पालव, बाबा गावकर, बाबाजी गोसावी, सुधीर धुरी, परशुराम नाईक,सेक्रेटरी अजिंक्य धुरी, हेमंत धुरी, जेष्ठ सल्लागार विजय पाताडे,वसंतराव धुरी , कमलाकर पाताडे जितेंद्र आत्माराम धुरी,बाबा घाडीगांवकर श्रीहरी धुरी, वासुदेव धुरी, चंद्रसेन धुरी,पांडुरंग गोसावी, प्रभाकर धुरी, पंकज गावडे, दिंगबर तांबे, मंगेश गवस, सीताराम तावडे, अक्षय धुरी, मकरंद धुरी, केशव चव्हाण, कृष्णा पुजारे, सत्यवान धुरी, संदेश धुरी , निलेश परब, शर्वरी ठाकूर , अनंत पाताडे, निशांत धुरी , दिव्या धुरी, सुभाष हरिचन्द्र धुरी, माजी उपसरपंच बाळा धुरी, श्रीकांत धुरी.व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page