बांदयात रुग्णांना फळवाटप

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गेले महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष महेश परुळेकर, तालुका अध्यक्ष विजय शेर्लेकर, तालुका उपाध्यक्ष आत्माराम बांदेकर, बांदा विभागीय अध्यक्ष संतोष जाधव, शेर्ले ग्रामीण शाखा अध्यक्ष उमेश जाधव, अजय अरोस्कर, शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परब, गौरांग शेर्लेकर, अमित महाले, कृष्णा जाधव, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, परिचारिका शांती कदम, परिचर सागर पाटील आदी उपस्थित होते.
फोटो :-
बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

You cannot copy content of this page