सर्वोत्कृष्ट खेळाडू अवि देवगड़कर तर अंतिम सामना सामनावीर विट्ठल कवटकर
*💫कणकवली दि.२४-:* संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी वरवडे फणसनगर मैदानावर झाला. स्पर्धेचे यावेळी १८ वे वर्ष होते. या सामन्यात मालवण तालुक्यातील महापुरुष रेवतळे संघ विजेता तर जिया इलेवन संघ देवगड उपविजेता ठरला. ५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरिच्या पहिल्या सामन्यात मर्यादित ६ षटकांच्या सामन्यात महापुरुष रेवतळे संघाने ब्राम्हणदेव कणकवली संघावर तर जिया इलेवन संघाने पाळेकरवाडि देवगड संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्याची नानेफेक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. नानेफेक जिंकून महापुरुष रेवतळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना जिया इलेवन देवगड संघाने मर्यादित ६ षटकांत ७५ धावा केल्या जिया इलेवन कडून तेजस करंगुटकर ७ चौकारांच्या सहय्याने ४१, तर अवि देवगड़कर १४,अमित चिंदरकर याने १४ धावांचे योगदान दिले, तर महापुरुष संघाकडून पायस अलमेडा २ व विट्ठल कवटकर याने २ गड़ी बाद केले. ७६ धावांचे उद्दिष्ट घेऊन उतरलेला महापुरुष रेवतळे संघ विट्ठल कवटकर ४ षटकार ३ चौकार सहय्याने ४० धावा करत प्रेक्षकांची मने जिंकली, सुनील मालवणकर १ षटकार १ चौकार नाबाद संयमी १६ धावा केल्या. रंगतदार झालेल्या सामन्यात महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ विजेता ठरला, जिया इलेवन देवगडच्या अवि देवगड़कर व प्रनील मेस्त्री यांनी प्रत्येकि २-२ गड़ी बाद केले. अंतिम सामना सामनावीर विट्ठल कवटकर तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ( मालिकावीर) म्हणून अवि देवगड़कर यांची निवड केलि. तसेच इतर वैयक्तिक बक्शीसांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज पायस अलमेडा( महापुरुष रेवतळे), फलंदाज तेजस करंगुटकर( जिया इलेवन देवगड) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शिवराज कोयंडे ( जिया इलेवन देवगड) उत्कृष्ट यष्टिरक्षक सुनील मालवणकर ( महापुरुष रेवतळे) यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविन्यात करण्यात आले. विजेत्या महापुरुष रेवतळे संघाला रोख रक्कम ४०००० व चषक तर उपविजेत्या जिया इलेवन देवगड संघाला रोख रक्कम २०००० व चषक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविन्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी यावेळी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापति सावि लोके, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मालवण सभापति अजिंक्य पाताड़े, उपसभापति राजू परुळेकर, प्रकाश सावंत,संतोष चव्हाण, महेश लाड़, अशोकभाऊं राणे, सुनिल नाडकर्णी, मेघा गांगण, अन्ना कोदे, अक्षय राणे, आनंद घाड़ी, गणेश तळगावकर, संतोष पुजारे, सुभा मालंडकर ,इब्राहिम शेख, सुशांत राऊळ, अनिल मेस्त्री, कांता मेस्त्री, मकरंद सावंत ,गुरु चव्हाण, सचिन पेडणेकर, नितिन पेडणेकर उपस्थित होते. पंच म्हणून बाबू चिंदरकर, शकील शेख, नितिन पवार, राकेश पावसकर , समालोचक अमोल जमदाडे, प्रदीप देउलकर, उमेश परब, शाम वाककर,राजेश माळवदे, सागर कदम, गुणलेखक म्हणून अतुल कोरगावकर, राहुल कदम, योगेश मेस्त्री, जयेश मेस्त्री यांनी काम पाहिले. ५ दिवस चाललेली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष समीर कवठणकर, परेश कांबळी, गणेश तळगावकर, नितिन पवार,गणेश रजपूत, बाबू हिंदळेकर,अभी साटविलकर, विट्ठल चव्हाण,प्रथमेश राणे,समीर ठाकुर, बंटी राणे, केतन दळवी,राजू पेंढुरकर, चीतरंजन जाधव,प्रथमेश कळसुलकर,विराज मेस्त्री, तेजस लोकरे, प्रवीण परब, ओंकार मेस्त्री,साहिल लाड, कलमेश कळसुलकर,दिव्येश मेस्त्री, नागेश नायर, करण पवार, प्रसाद काकड़े, नितेश मेस्त्री,केदार मेस्त्री, राजू भिसे, तुषार पावसकर,गंधार कोरगावकर, प्रतीक कोरगावकर,मांतेश पुजारे, विकास पुजारे,
