मंदिर परिसरात उपलब्ध केली आसन व्यवस्था : भाविकांतून समाधान
⚡बांदा ता.११-: पाडलोस रवळनाथ माऊली पंचायतन मंदिरात उत्सव तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांवेळी भाविकांना बसण्यासाठी सोय व्हावी म्हणून मंदिर परिसरात सिमेंटच्या बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रवळनाथ मित्र मंडळ यांच्यातर्फे दोन बाक तर मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांच्या तर्फे एक बाक देण्यात आल्याची माहिती मंडळाचे बंटी गावडे दिली.
मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बाक उपलब्ध करुन देण्याचा मानस पूर्वीपासून होता. पाडलोस रवळनाथ देवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रवळनाथ मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आम्ही हे कार्य पूर्णत्वास आणल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले. तर पाडलोस रवळनाथ मित्रमंडळाने बसण्यासाठी आसन व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याने समाजाला नवा आदर्श दिल्याचे पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे यांनी सांगितले व मंडळाचे कौतुक केले.
