कुणकेश्वर मंदिर येथील भाविकांचा उपक्रम:शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी
⚡देवगड ता.११-: श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज हापूस आंबा आरास श्री देव कुणकेश्वर मंदिर गाभारा व अन्य मंदिर सभागृह परिसरात करण्यात आली आहे.११हजार १११आकर्षक आब्यांची आरास ल करण्यात आली आहे.
यात श्री कुणकेश्वर मंदिरात तसेच श्रीं च्या गाभाऱ्यात पिंडीभोवती आकर्षक अशी हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. हापूस आंब्याच्या आराशीमध्ये सजलेल्या श्री देव कुणकेश्वराचे दर्शन भाविकांना घेता येत असून गुरुवारी सकाळी पासून भाविक शिवभक्तांनी दर्शनाकरिता रांगा लावल्या होत्या. भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर तसेच ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले होते.
