जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

⚡मुंबई दि.११-: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आलीय. सोमवारी जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयएल आणि एफएस या कंपनीतील व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे

You cannot copy content of this page