⚡सावंतवाडी,ता.०२: येथील कोनाळकट्टा पोस्टात तब्बल १ कोटी १० लाख ८२ हजाराचा आर्थिक अपहार केल्या प्रकरणी चौघा जणांची येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सुरेश वासुदेव बांदेकर, हनुमंत शंकर धुरी दोघे (कोनाळकट्टा-बांदेकरवाडी ता, दोडामार्ग), मानसी निलेश गंगावणे (रा. भटवाडी वेंगुर्ला), रमेश रामराव वाघुलकर (रा.विद्यानगर- परळी, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत. या कामी अॅड.अनिल निरवडेकर,संग्राम देसाई, गणेश चव्हाण, अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
कोनाळकट्टा पोस्ट आर्थिक अपहारप्रकरणातील आरोपींची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
